काल सैराट पाहिला. बरेच दिवस ह्या चित्रपटाबद्दल ऐकत होतो. उलट सुलट मेसेजेस वाचत होतो. हा कसा पाहिला पाहिजे किंवा पाहू नये हे सगळं चालू होतं. चित्रपट कसा आहे हे सांगेनच. पण चित्रपटाची प्रसिद्धी कशी करावी हे आता मराठी निर्मात्यांना कळायला लागलंय असं म्हणायला हरकत नाही. जे उलट आणि सुलट मेसेजेस फिरत होते हे ठरवून फिरवलेले होते अशी शंका नक्कीच निर्माण होते. आणि जर ठरवून फिरवले असतील तर चित्रपट पराभूत झाला असं म्हणावं लागेल. कारण असल्या मेसेजेसमुळे जातीभेद जास्तंच अधोरेखित झाला.
असो. चित्रपटाबद्दल फार सांगायला मी काही समीक्षक नाही. त्यामुळे अगदी समिक्षकासारखे परीक्षण नाही करू शकणार. पण समिक्षकापेक्षा प्रेक्षक मोठा असतो आणि जास्त सुज्ञ असतो. कारण मुळात प्रेक्षक पैसे देऊन चित्रपट बघत असतो. त्याचे कोणी मित्र सगे सोयरे त्या चित्रपटाशी निगडीत नसतात. त्यामुळे कुठलेच चष्मे घालून प्रेक्षक चित्रपट बघत नसतो. चित्रपट सुंदर आहे. अजय अतुल दिवसेंदिवस अप्रतिम संगीत देत आहेत. हिंदी चित्रपट सोडून मराठीत परत आल्यानंतर बहुधा हा त्यांचा पहिलाच चित्रपट. पण संगीतानी चित्रपटात जान आणली आहे. पार्श्वसंगीतही तितकंच दमदार. चित्रपटाचा पूर्वार्ध जमून आलाय. विशेषकरून पात्रांची निवड आणि उभारणी. सर्वच कलाकारांचा अभिनय अतिशय उत्तम. चित्रपटाचा शेवट हा लक्षात राहील असा. चित्रपटाचा पूर्वार्ध किंवा प्रेमकथा जेवढी फुलते तेवढाच रंजक पण उत्तरार्ध कंटाळवाणा वाटतो. (वास्तविक उत्तरार्ध लांबीच्या दृष्टीनी छोटा आहे) आता ह्यात अनेकजण म्हणतील की तुला "सिनेमा" कळत नाही. खरय नाहीच कळत मला "सिनेमा" पण आता कंटाळा येतो तर काय करणार?
मुळात मी हे लिहिण्याच कारण काय? सांगतो
हा चित्रपट पाहून चित्रपटसृष्टीतले लोक ह्याच अतिरेकी कौतुक करत आहेत. त्यांना कदाचित "सिनेमा" कळत असावा. हा चित्रपट चांगला ह्यात वाद नाही. परंतू सगळा "सिनेमा" वास्तवदर्शी आहे हे म्हणण अगदी धादांत खोटं. आंतरजातीय विवाह हे प्रकरण वास्तवदर्शी पण त्यातली "आर्ची"??? तिचं काय? दाखवा बघू अशी मुलगी आणून. जे ह्या सिनेमाचं कौतुक करतायत त्यातले बव्हंशी लोक हे यश चोप्रा करण जोहर शाहरुख ह्यांच्या चित्रपटांना इतकंच काय तर आपल्या लक्ष्या आणि अशोक सराफच्या चित्रपटांना नावं ठेवणारे आहेत. पण ह्या चित्रपटाचा पूर्वार्ध हा अगदी चोप्राकाकांच्या चित्रपटातला वाटतो. फरक इतकाच की ते स्वित्झर्लंड दाखवतात नागराज करमाळा दाखवतोय. ते सरसो का कसली शेती दाखवायचे हा उसाचं वावर दाखवतोय. तिथे प्रस्थापित सुंदरी हिरोईन म्हणून असतात इथे अजून प्रस्थापित नसलेली आणि रूढ अर्थानी माधुरी नसलेली आर्ची आहे. पण कपडे बदलले म्हणून वस्तुस्थिती बदलत नाही ना. ज्यावेळी हिंदीत असे चित्रपट बनत होते तेव्हा हे कसे "चित्रपटच" नाहीत असं सांगून ही मंडळी घसा कोरडा करत होती आणि आपल्या लोकांना कसा "सिनेमा"च बनवता येत नाही हे ठासून सांगत होती. म्हणे सैराटनी मुलामुलींना प्रेम करायला शिकवलं!!!! सैराटच्या आधी जसं प्रेम लोकांना माहीतच नव्हतं!!! अहो चोप्रकाकांनी आख्खी हयात घालवली त्यात. सैराटच्या निमित्तानी जशी जातीव्यवस्था दिसू लागली तशीच ह्या लोकांचे दुटप्पी चेहेरेसुद्धा. जे लोक ओरडून सांगत होते की चोप्रा मूर्ख आहे तेच आज सैराट मधल्या दृश्याचं कौतुक करताहेत. जातिभेदापेक्षा ह्या लोकांची दांभिकताच जास्त अधोरेखित झाली असं वाटतं.
चोप्रांचा तो चित्रपट आणि आमचा तो "सिनेमा" हा भ्रमाचा भोपळा आता तरी फुटेल. पण कितीही बोंब मारली तरी प्रेक्षकांनी त्यांच्या चित्रपटाला "सिनेमा" म्हणलं हेच सत्य. जर गावातल्या वावरात, किल्ल्यात नायक आणि नायिका प्रेमगीत गात असतील तर तेच त्यांच्या स्वप्नात स्वित्झर्लंडच काय मंगळावर सुद्धा गाऊ शकतात. जर गावातली नायिका बुलेट आणि Tractor चालवत असेल तर मग धावती ट्रेन काजोल नक्कीच पकडू शकते!!! मला सैराटची प्रेमकथा आवडली हे खरं आहे परंतू उगाच हे नवं आहे किंवा हे वास्तवदर्शी आहे हे मात्र सांगू नका. जर वास्तवदर्शी काही असेल तर तो ह्या "सिनेमा"चा उत्तरार्ध. पण हे आधी कयामत से कयामत तक पासून ते अगदी चोप्रांच्याच निर्मितीचा इशकजादे पर्यंत येऊनच गेलंय की. ग्रामीण बाज दिला की चित्रपट वास्तवदर्शी आणि शहरी असला की फालतू हा केवळ मूर्खपणा आहे.
मुळात चित्रपट हे मनोरंजनाचं माध्यम आहे. त्यातून उगा सल्ले देण्याचा अथवा समाज बदलवण्याचा आव कशाला? समाजपरिवर्तन घडवू शकेल इतकं चित्रपट हे माध्यम प्रभावी नाही. अन्यथा 3 Idiots नंतर इंजिनियरिंग कॉलेजेस ओस पडली असती (आता इडियट कोण ते ठरवा) अमिताभ कडे बघून केव्हाच लोकांनी कॉंग्रेसला उलथवून लावलं असतं. त्यामुळे "सिनेमा"नी सुद्धा केवळ मनोरंजन करावं. आणि प्रेक्षकांनी सुद्धा मनोरंजन म्हणूनच बघावं. अर्थात प्रेक्षकांनी मनोरंजन म्हणूनच बघावं असं हे "सिनेमा" वाले अडचणीत आले की सांगतातच.
अजून एक गोष्ट जी अनेक मुलाखतीतून दिसली ती म्हणजे ग्रामीण भागातले "सिनेमे"च कसे उत्कृष्ट आणि शहरी कसे वाईट. "मातीतला" "सिनेमा" कसा बनायला हवा आणि बरंच काही पुर्वप्रसिद्धीच्या मुलाखतींमधून पाहिलं. समाजातल्या भिंती पाडता पाडता ह्या नव्या भिंती कोण उभारतय??? "सिनेमा"च असं वर्गीकरण का? ग्रामीण भागातल्या माणसालांच जर आयुष्याचा अनुभव असेल तर शहरातला माणूस काय करतो? आणि जर शहर वाईट तर शहरात "सिनेमा" प्रदर्शितच का करावा? शहरात सगळ गोड गोड असतं आणि जीवनात संघर्षच नसतो हे कोणी सांगितलं? समस्या वेगळ्या असतील पण समस्या आहेतच ना?? त्यामुळे चित्रपट हा चांगला किंवा वाईट असाच असतो. प्रेमकथा मग सैराट असो वा मुंबई पुणे मुंबई दोन्ही चांगल्याच असतात.
शेवटी सांगतो सैराट चांगला परंतू "नवीन" नाही. सैराट बघू नका सांगणारे मूर्ख तसेच तुमचा कट्यार तर आमचा सैराट म्हणणारे सुद्धा. दुटप्पी लोक ही दुसरी गोष्ट सांगत नाहीत. हे खऱ्या अर्थानी समीक्षण नाही. पण सैराटच्या निमित्तानी दांभिकता मात्र दिसली. आणि कयामत से कयामत तक ते सैराट व्हाया एक दुजे के लिये, साथिया, वीर जारा, इशकजादे हा प्रवास मात्र दमवणारा होता

No comments:
Post a Comment